Wednesday, June 28, 2017

का?

महिकाचे 'का' प्रश्न सुरु झालेत. इतके की कधी कधी आपल्याकडेपण उत्तर नसतं त्यांचं.

काल रात्री महिका आणि तिच्या बाबाचं 'Knowledge sharing session' चालू होतं. काय काय प्रश्न विचारले तिने बाबाला!

पहिला वाहिला प्रश्न: "बाबा, आपण जेवण का करतो आणि पाणी का पितो?"

किती 'basic' प्रश्न झाला! पण तिच्या बाबाने खूपच छान उत्तर दिले. तिला कळेल आणि पटेल अश्या भाषेत. त्या नंतर तर प्रश्नांचा भडीमार होता. हर एक प्रश्न वेगवेगळा.

"बाबा animals आपल्या बरोबर घरात का नाही राहत, जंगलात का राहतात?"

"बाबा आपण newspaper का वाचतो?"

"आपण घरात का राहतो?"

"सिग्नल का असतात?"

"आपण खुर्चीवर का बसतो?" (How cute and funny!!)

"How shall we make a cake?"

"How shall we make a tomato?"

"How shall we make bhaji and roti?"

रात्री सगळे प्रश्न संपले नाहीत की काय म्हणून सकाळ-सकाळी उठल्या-उठल्या मला एक-दोन प्रश्न:

"आया, आता तू सांग. आपण घड्याळ का घालतो?"

"झाडाला फुलं का असतात?"

हे सर्व प्रश्न ऐकून त्यांना समर्पक उत्तरं द्यायची ही आपली जवाबदारी.

पण खरं तर ह्यातून हेच दिसतं की ही लहान मंडळी किती वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतात आणि किती कुतूहल असतं त्यांना!

लहानग्यांचे भावविश्व, विचारसरणी, आणि imagination हे असेच विस्मयकारक असो! कायम असे प्रश्न सुचो आणि उत्तरं पण मिळो हीच मुलांना शुभेच्छा!

लहानपणची निरागसता आणि curiosity आपण मोठे होताना का बरं हरवून जाते? 

No comments:

Post a Comment

The Moral Compass

Screech! I braked hard as a teenager cut me off from the opposite direction. I took a deep breath, trying to regulate my body after the adre...