Friday, July 16, 2010

कोट, टोपी, आणि धोतर घातलेले आजोबा

काल मी सकाळी साधारण साडे आठ वाजता झेड पुलावरून जात होते. तेव्हा बघितलं अश्या एका आजोबाना. स्वच्छ, पांढरे धोतर, छानसा फिकट पिवळा कोट, आणि डोक्यावर काळी टोपी. पुलावरून खाली पाण्यात बघत होते. इतके छान होते ते.
असले आजोबा आता दुर्मिळच.

खरंच, आजचे आजोबा सगळे hi-tech झाले आहेत. धोतर-टोपी तर सोडाच, साधा सदरा घातलेले आजोबा पण दिसत नाहीत. हल्लीचे आजोबा directly T-Shirt, Jeans, कॅप, आणि काय-काय नवीन fashionable कपडे घालतात.

तसं बघायला गेला तर आजकालच्या आज्ज्या तरी कुठे नऊवारी साड्या घालतात? त्या देखील पंजाबी ड्रेस घालतात, काही आज्ज्या तर अगदी Jeans, T-Shirt देखील घालतात. हा आहे आजच्या एकविसाव्या शतकातील "change."

म्हणजे हा बदल चांगला नाही असा मी नाही म्हणत. पण असले आजोबा किंवा नऊवारी घातलेल्या आज्ज्या दिसल्या की एकदम भूतकाळात जातो आपण आपसूक. आपले स्वतःचे आजी-आजोबा आठवतात. आणि मग त्यांनी आपले केलेले सगळे लाड पण.

आज्जी बरोबर दुपारची कामं केलेली आठवतात. दुपारची कामं म्हणजे सांडगे करणे, पापड करणे, कसले-कसले मसाले करणे. काय-काय असायचं. आणि दुपारी कपडे धुणाऱ्या बाई आल्या की आज्जीची साडी वाळत घालायच्या. तेव्हा आणि अजूनही असं वाटतं की केवढी मोठ्ठी ती आज्जीची साडी! हाल्ली साधी पाचवारी साडी घालायला पण कंटाळा येतो.

आजोबा आमच्या करता संध्याकाळी काय-काय आणायचे: गोळ्या, कणसं, बोरं, गरम-गरम खरी, चण्या-मन्या बोरं...फार मज्जा यायची.

आज्जीने एक मोडक्या घड्याळ घेऊन आम्हाला घड्याळ बघायला शिकवल होता. पण आता परत कशी आणू शकू आपण ती वेळ???

4 comments:

 1. होय अगदी खरं आहे , ती वेळ आपण परत आणू शकत नाही. मला पण हे पोस्ट वाचून माझे आजी आजोबा आठवले.आजोबा धोतर टोपी घालत आजी नउवारी नेसायची.आणि त्यामुळे मनात नउवारी नेसलेली ती आजी सामावली आहे.तिची ती साडी लांबच लांब,cotton ची आणि अगदी मऊ मऊ परत तिचे सोवळे ओवळे पण कडक होते.तिने जे काही आम्हां भावंडांना दिले ते खूप उपयोगी पडले,लहानपणी आजी आजोबा घरी होते,त्यांचे अनुभवाचे संस्कार आमच्यावर झाले.
  आज जग बदलते आहे,modern आजी आजोबा सर्वत्र दिसताहेत,कपडे पेहेराव बदललेला जाणवतो आहे.हे खरे.खूप खूप शिकलेले आजी आजोबा,pant,shirt,T shirt,सलवार कमीज हे नवे कपडे घालून बदल झालेला दिसतो आहे ..पण मला मात्र तो जुना काळ जास्त हवासा वाटला जेव्हां तुझे पोस्ट वाचले आता.

  ReplyDelete
 2. मराठी सुद्धा किती छान लिहितेस तू. मला हे पोस्ट फार आवडलं.

  ReplyDelete
 3. Thanks so much for the beautiful reply, Monica (Shriya). जुना काळ मंतरलेला होता. आता खूप बदल झालेत. पण तो काळ म्हणजे अत्तर लावून ठेवलेले ठेवणीतले कपडे कधी उघडले की कसा घमघमाट येतो सुवासाचा, किंवा बकुळीची फुलं जपून ठेवली आणि काही दिवसांनी उघडली की कसा सुंदर वास येतो, तसं. कुपी खोलण्याचा अवकाश...सुवास सर्वदूर पसरतो. तसंच...या जुन्या काळाच्या आता आठवणीच. कधीतरी चुकून अश्या ताज्या होतात.

  Thanks, Sharvari. काही तरी प्रयत्न केला गं मराठीत लिहायचा. खरं तर, जेव्हा त्या आजोबाना पाहिलं, तेव्हाच ठरवला होतं की ह्यांच्या वर blog लिहायचा, तो पण मराठीत. बघू परत कधी योग येतोय मराठीत ब्लोग लिहायचा.

  ReplyDelete
 4. Chhaan .... Thanks!!! Ajji-Ajjobanchi aathvan karoon dilya baddal.
  ...kaal badalto, lok badaltaat, poshaakh badalta....aataa aapan kai aaplya aai vadilaan sarkhe (mhanje tay jevha aaplya vayache hote) tase vaavarto ka? ... aani ho aapan pan ajji ajjoba honaar in distant future.... can you imagine yourself in a 9vaari?

  ReplyDelete