Friday, May 25, 2018

आया, चल आपण clock-clock खेळूयात!

...ही आज्ञा महिकाने मला दिली आणि माझे विचारचक्र सुरु झाले. खरे तर क्लॉक कसे चालते, किती वाजले, हे सर्व कळायला अजूनही ती लहान आहे.

अजूनही "काल" ला "आज" किंवा "उद्या" वापरते ती: "आया, आम्ही उद्या गार्डन मध्ये एक नवीन game खेळलॊ."

ह्या चिमुरडीला क्लॉक कसे समजवायचे!

मग मीच एक शक्कल लढवली.

Sticky Notes घेतल्या. त्यावर महिकालाच १ ते १२ हे क्रमांक लिहायला दिले. व्यवस्थित गोलाकार जागा दाखवून
तिला घड्याळासारखे सर्व क्रमांक फरशीवर लावायला सांगितले.

आता काटे कसे करायचे? महिकाला मग समजावले, घडाळ्यात तीन काटे असतात: तास काटा, मिनिट काटा, आणि सेकंद काटा. तिला सांगितले, मिनिट काटा बन! मी बनले तास काटा.

शाळेकरता उठायची वेळ आणि शाळेची van घ्यायला येते तो पर्यंत महिका काय काय करते, कसे करते, किती वेळ घेते, काय-काय म्हणते हे सर्व म्हणून आणि करून दाखवलं! आणि ह्या सर्व वेळेत महिका खरोखरी काट्यांसारखी गोल-गोल फिरत होती!

काय मज्जा अली! जरी तिला घड्याळ वाचायला कळले नसले तरी वेळेचे महत्व कळले असेल तरी छान! त्यात role - playing  झालं, तिला "running" करायचे होते घरात तेदेखील झाले!

एकूणात, एक वेगळा खेळ झाला! फारच गम्मत!

Itni Si Khushi

I cannot believe that I haven't written a word since more than two years! It's not just saddening, but also downright depressing. Ge...