Monday, July 3, 2017

(पावसाळ्यातले) रस्ते

वर्षा ऋतू असे सुंदर नाव असणारा आणि खरोखरी आनंददायी अश्या ऋतुचीदेखील एक unavoidable आणि त्रासदायक गोष्ट आहेच - रस्ते!

पावसाळ्यातले रस्ते हा सगळ्यांचाच अतिशय जिव्हाळयाचा विषय! कितीही बोललो त्यावर तरी ते कमीच असते. 

कडक उन्हाळा सोडून, पावसाळ्याच्या सुरवातीलाच महापालिकेला रस्ते उखडायचे असतात! बरं ही कामं लवकर आणि वेळच्या वेळेस संपली तर महापालिका कसली! बरोब्बर पावसाळ्याआधी खणलेले रस्ते पहिल्या पावसात धोकादायक डबकी होऊन जातात. "माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळशी सर्व पसारा" हे वाक्य तंतोतंत खरं व्हावं, ह्याकरता अविरत धडपड चालू असते खोदणाऱ्यांची. 

मग भर पावसात गाडी ह्या अग्निदिव्यातून, सॉरी, पाणीदिव्यातून नेण्याची परीक्षा आपली. प्रत्येक डबकं हे जेव्हडं खोल, रुंद, आणि भरीव असेल तेव्हढं कसब वाहनचालकांना लावावं लागतं. मला वाटतं महापालिका ही असली डबकी मुद्दाम बनवते. पावसाळ्याच्या ऋतूत RTO च काम कमी व्हावं असा सुप्त हेतू असणार. कारण ह्या डबक्यांना avoid करत तुम्ही गाडी zigzag चालवू शकलात तरंच तुम्हाला गाडी 'हाकायचा' परवाना मिळणार असे RTO चा गुप्त नियम असणार. 

खड्डे चुकवीत अथवा तुडवीत गाडी चालवून अगदी हेच आठवतं: "फिरत्या चाकांवरती पाठीला होतात विकार, बाईक असो वा कार!" म्हणजे खरं तर ह्या खड्डयांमुळेच कित्येक orthopaedic डॉक्टर्सचा गुजारा चालू आहे. जनकल्याणाचे अखंड कार्य पालिकाच करू शकते. 

पण त्याशिवाय अश्या खड्ड्यातून जाण्याची एक गम्मत आहे खरी. तुमची जर लहानपणची उंटावरून सैर करायची हौस राहिली असेल तर ती खड्ड्यातून जाताना पूर्ण होईल. तुमच्या पुढ्यात एखादी गाडी नाही हे बघून खड्ड्यातून जाताना ५ सेकंद डोळे मिटा... तुम्ही स्वतः उंट चालवत आहात असे नक्कीच जाणवेल तुम्हाला!

अश्या पावसाळ्यातल्या जलमय रस्त्यांवरून तुम्ही तुमच्या इष्ट स्थानी वेळेत आणि धड पोचलात तर तुम्हाला "सर्वात जागृत वाहनचालक" ही पदवी मिळेल असे पालिकाने जाहीर केल्याचे ऐकिवात आहे! पहिला मानकरी कोण असेल?

The Moral Compass

Screech! I braked hard as a teenager cut me off from the opposite direction. I took a deep breath, trying to regulate my body after the adre...