Friday, February 17, 2017

आवाज कोणाचा???

महानगर पालिका निवडणुका तोंडावर आल्यात. वातावरण सगळीकडेच चांगलेच तापले आहे.

कुठला पक्ष जिंकणार ह्याकडे सगळ्यांचे लक्ष आहेच. पण तत्पूर्वी, निवडणुकांची धामधूम बघायला मज्जा येत आहे. रस्त्यारस्त्यावर रिक्षा, bikes, बसेस, आणि मोर्चे ह्यातून प्रचार होत आहे.

प्रत्येक उमदेवार हा "गरिबांचे दुःख जाणणारा, त्यांच्या समस्या सोडवणारा, हळवा, कर्तव्यदक्ष, सुशिक्षित, आणि शब्द पाळणारा" आहे. प्रत्येक उमेदवाराने भरपूर (खाबू) कार्ये केली आहेत, म्हणूनच तो/ती जनतेची आवडती आहे. (म्हणून तर प्रत्येकाची कित्येक कोटी मालमत्ता आहे.) निवडून आलो तर काय काय करून जनतेचा सेवक म्हणून कार्यक्षम राहू हे प्रत्येक जण पटवून देत आहे.

ह्या निवडूणुकीत प्रचार केवळ सभा, भाषणे ह्या पुरता मर्यादित नाही राहिलेला. मतदारांना स्वतः जाऊन भेटणे, इथंपासून, मतदारांच्या भ्रमणध्वनीवर फोन/sms इथपर्यंत सर्व युक्त्या वापरायला जात आहेत.

एकमेकांच्या पक्षांना नावं ठेवणे, कुरघोड्या करणे, कार्यकर्त्यांमध्ये वाद घडवून आणणे येथपासून 'आमुक आमुक शहर देशोधडीला लावण्याचे काम" विरोधी पक्ष करत आहे इथपर्यंत वाद-प्रतिवाद चालू आहेत. खरं किती, खोटं  किती हे जाणकार मतदार जाणतातच. तथापि सर्व उमेदवारांची हि बाचाबाची बघायला, ऐकायला गम्मत वाटते.

ह्या निवडणुकीत मला जाणवलेली गोष्टं अशी कि अपक्ष उमेदवार बरेच आहेत. त्या सगळ्यांची चिन्हे फारच गमतीशीर. नारळ, शिट्टी, कप-बशी, क्रिकेट खेळणारा खेळाडू, मेणबत्त्या, टेबल, खुर्ची, गॅस सिलेंडर, कॅमेरा, कंगवा,फुगा ह्यासारखी अनेक चिन्हे!!!! साधारण हजाराच्यावर उमेदवार रिंगणात आहेत. बहुदा अपक्षांची संख्या जास्त असावी.

ह्या रणधुमाळीत, कोणी जिंकेल, कोणी  हरेल! कोणाचे नशीब फळफळेल, कोणी अगदी हिरमुसून जाईल!! आवाज कोणाचा येईल??? मतदारांचा की खणखणाऱ्या नाण्यांचा???

Itni Si Khushi

I cannot believe that I haven't written a word since more than two years! It's not just saddening, but also downright depressing. Ge...